INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI | 15 AUGUST BHASHAN MARATHI | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी

INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI | 15 AUGUST BHASHAN MARATHI 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे कारण, याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ति या दिवसाची वाट पाहत होता. यासाठी खूप स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, आणि या भारत मातेला स्वतंत्र केले याच दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतात शाळेत, कॉलेज, सरकारी ऑफिस, सामाजिक संस्था यात झेंडा वंदन आयोजित केले जाते. नवीन पिढीला या दिवसाचे महत्व कळण्यासाठी आपण भाषण देतो, व त्यातून नव्या पिढीला दिशा देतो.

INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI

आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र दिन ! आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI


भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूर वीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू अश्या हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला.


आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाला थोर महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ न देता, त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिचे. आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र.

100+ सुविचार बघण्यासाठी येथे – क्लिक करा INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI

15 AUGUST BHASHAN MARATHI

“गुंज रहा है दुनिया मे …
हिंदुस्थान का नारा ।
चमक रहा है आसमान मे
तिरंगा हमारा ।”

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो. आज १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा सन्मानाचा तसेच उत्साहाचा दिवस आहे. या मंगलदिनी सर्व प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा …

” तिरंगा झेंडा फडकतो,
जयजयकार बोला …
१५ ऑगस्ट, आज आमचा
भारत देश स्वतंत्र झाला “

१५ ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत्य महत्वाचा आहे. याच दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम गिरीतून मुक्त झाला.
मित्रांनो आपल्या भारत देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक नेत्यांनी आणि शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

आठवण स्मरावी त्यांची
ज्यांनी देशासाठी बलिदान केले,
क्रांतीसाठी जे झटले अन,
क्रांतिवीर झाले

आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे विविधतेत एकता हे भारताचे ब्रीद आहे. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु, अजूनही गरीबी, भ्रष्टाचार, असमानता अशा समस्या आहेत. त्यावर आपण सर्वांनी मिळून मत केली पाहिजे.
देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारत स्वस्थ, शिक्षित, आत्मनिर्भर व स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला
मुजरा मानाचा…

जय हिंद, जय भारत !

मराठी उखाणे बघण्यासाठी – क्लिक करा INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI

15 AUGUST BHASHAN MARATHI

स्वातंत्र्याची ध्वज फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारत भूमीच्या पराक्रमाला
मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा…..

सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन.
आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मनाचा दिवस आहे. अश्या या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


१५ ऑगस्ट १९४७….. होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.


भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नातून व आत्मबलिदानातून स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता, त्यामुळेच समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारत पूर्वी इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेच्या वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले. याच कारणामुळे देशातील अनेक स्वतंत्र सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अश्या कित्येक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले.


लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा केली. टिळक यांच्या नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध


१५ ऑगस्ट १९४७ ही भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली तारीख आहे. हा तो दिवस आहे जेव्हा भारतातील जनतेने पहिल्यांदा स्वतंत्र देशात श्वास घेतला. हा तो दिवस होता ज्या दिवशी भारतातील जनतेला न्याय हक्क मिळाले किंवा अशी म्हणता येईल कि हा तो दिवस होता ज्या दिवशी या देशाची माती, धूळ, नद्या, पर्वत, जंगल हवामान आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळाले.

INDEPENDENCE DAY SPEECH IN MARATHI


पण हे एक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीर्घ काळ संघर्ष करावा लागला. यासाठी अनेकांनी लढा दिला, अनेकांनी सरकारच्या अत्याचारांना तोंड दिले, अनेकांना दुखापतग्रस्त व्हावे लागले, अनेक जण शहीद झाले. अनेकांनी हसतमुखाने फाशीचे चुंबन घेतले आणि मृत्यूला देखील मिठी मारली, तर अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य, आपले संपूर्ण तारुण्य भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घालवले. भारत मातेच्या या खऱ्या सुपुत्रांच्या त्याग आणि बलिदानामुळेच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. भारताच्या मातीतील सुपुत्रांच्या निर्धारामुळेच आज आपण सर्वजण लोकशाही देशात जगू शकत आहोत. आणि राष्ट्रध्वज तिरंगा फडकताना पाहू शकत आहोत. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ चा उल्लेख होताच प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून येते.


देशाचे पंतप्रधान दरवर्षी या १५ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन तिरंगा फडकावतात. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला तेव्हाही भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि तेव्हापासून आजतागायत हि परंपरा सुरु आहे. या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात आणि त्या नंतर ते लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करतात. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण देशात टीव्ही आणि रेडिओ द्वारे प्रसारित केले जाते. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी लाल किल्ल्यावर येतात.


भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित भव्यदिव्य कार्यक्रम केवळ लाल किल्ल्यापुरता मर्यादित राहत नाही तर या दिवशी हा राष्ट्रीय सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सरकारी कार्यालय यासोबत शाळा, महाविद्यालय यामध्येही तिरंगा फडकवला जातो. शैक्षणिक संस्थामध्ये मुले आणि पालकांमध्ये मिठाई चे वाटप केले जाते आणि भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दरम्यान अनेक मुले भाषण देतात, तर अनेकजण नाटक, गाणी आणि इतर कलांच्या माध्यमातून हा दिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतात.


स्वातंत्र्य दिनाच प्रत्येक भारतीयांसाठी विशेष महत्व आहे. कारण या दिवशी केवळ आपला देश स्वतंत्र झाला नाही तर या दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले. हा दिवस देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करते आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देते. हा केवळ राष्ट्रीय सण नसून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या तन, मन आणि धनाचे बलिदान दिले, त्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. मग ती राणी लक्ष्मी बाई असोत, शाहिद भगत सिंग असोत या सर्वांचे स्वतंत्र भारताचे स्वप्न होते. आज आपण त्यांच्या स्वप्नातील देशात जगात आहोत.