LOKMANYA TILAK SPEECH IN MARATHI लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी होते. त्यांचा ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना सर्वांना माहित आहे अश्या महान व्यक्तीमत्व बद्दल भाषण सादर …
LOKMANYA TILAK SPEECH MARATHI | भाषण क्र 1
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक.
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते.
लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशागर बुद्धीचे होते. आत्मविश्वासाने निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते 877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली त्यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केली त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांना एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती उत्सव सुरू केले
इंग्रज सरकारविरुद्ध आपला आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगाव लागला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय शांततेचे जनक असे म्हटले.
एक ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मावळला अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम!! LOKMANYA TILAK SPEECH MARATHI
UKHANE IN MARATHI – Click here
LOKMANYA TILAK SPEECH IN MARATHI | भाषण क्र 2
“क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली
स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य जनतेला दिली”
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
सर्वांना माझा नमस्कार!
आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या विषयी बोलणार आहे.
लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. यांच्या वडिलांचे नाव गंगाधर वयाचे नाव पार्वती बाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप हुशार व इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध पेटून उठणारे होते.
एकदा वर्गात शेंगाची टरफल पडली होती गुरुजी वर्गात आले आणि ती टरफले टिळकांना उचलण्यात सांगितले.
टिळकांनी त्यास नकार दिला आणि ते ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफली उचलणार नाही यावरून त्यांचा कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती दिसून येते.
प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली तसेच वकिलीची पदवीही मिळवली. त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती साजरी करणे सुरू केले यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत केले.
इंग्रजी विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना सहा वर्षाचा तुरुंगवास झाला तेथे त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते. त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली गेली.
दुर्दैवाने एक ऑगस्ट 1920 रोजी या तेजस सूर्याने जगाचा निरोप घेतला असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. LOKMANYA TILAK SPEECH MARATHI
अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम!
LOKMANYA TILAK SPEECH IN MARATHI | भाषण क्र 3
“नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते
समृद्ध लेखणीची जाती मशाल होते
परकीय बंदीवार शापित देश होता
पण आग केसरीचा एक एक लेख होता
त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला
भारतात स्वातंत्र्य सूर्य आला.”
अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
प्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्या आज पुण्यतिथी.
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचे मूळ नाव केशव असे होते पण बाळ हे टोपण नाव कायम राहिले.
प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी टिळकांची बालपणापासूनच ख्याती होती गणित आणि संस्कृत या विषयांवर त्यांचे उदंड प्रेम होतं. अतिशय क्लिष्ट गणित हे टिळक अगदी तोंडी सोडवत असतात त्यांच्या अशा बुद्धिमत्ते पुढे शिक्षकही चकित होऊन जायचे.
लोकमान्य टिळकांना त्या काळात चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली असती पण त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला जे सरकार देशावर जुलूम करतं आपल्या मातृभूमीला लुटून कंगाल करतं अशांची नोकरी त्यांना कदापि पटली नाही.
हिंदुस्तानी तरुणांनी स्वावलंबी व्हावं त्यांच्या मनात देशप्रेम जागृत व्हावा म्हणून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांनी पगार न घेता शिक्षकाचे काम पत्करलं.
देश व समाजात राज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले तसेच लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती या उत्सवांना सुरुवात केली.
१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारले आपले वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा झाली, मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतात लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय जनतेचे जनक म्हणून संबोधले आधुनिक भारत आणि आशय राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
टिळक म्हणत कोण कुठला हा इंग्लंड देश ? “आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुंकलो तरीही त्यात वाहून जाईल” स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. “देश कार्य म्हणजेच देवकार्य” हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनात रुजवला. LOKMANYA TILAK SPEECH MARATHI
भारत मातेचे अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले या थोर नेते विषयी सांगायचे ते थोडेच आहे भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे अशा या महान नेत्याला व समाज कार्य करणाऱ्या मानवाला माझा मानाचा मुजरा!!
LOKMANYA TILAK SPEECH IN MARATHI | भाषण क्र 4
सन्माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.
LOKMANYA TILAK SPEECH IN MARATHI | भाषण क्र 4
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” असे इंग्रजांना अतिशय ठणकावून आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकमान्य टिळक.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे जन्मनाव नाव केशव ठेवण्यात आले होते. पण सर्वजण त्यांना लाडाने ‘बाळ’ म्हणत. त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते.
टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणी प्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपू लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हातच धरूच शकत नव्हते. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली अन् सोडवायला सुरूवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्यक्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींनासुद्धा खूप आश्चर्य वाटले.
टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता. टिळकांची शेंगांच्या टरफलांची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. एकदा टिळक वर्गात बसलेले असताना, त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी टिळकांना उभे केले व त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले. तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही.” आणि टरफलं उचलण्यास साफ नकार दिला. किती हे धाडस! किती ही हिंमत! आणि किती ही अन्यायाविरुद्ध चीड! पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला, इंग्रज शासनाच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी!
अश्या या महान व्यक्तिमत्वाला वंदन मी माझे भाषण संपवितो. LOKMANYA TILAK SPEECH MARATHI
“जय हिंद जय महाराष्ट्र”