Life quotes in Marathi | Motivational quotes in Marathi | Suvichar in Marathi | 100+ Motivational quotes👍

या लेखामध्ये Motivational quotes in Marathi, Life quotes in Marathi अभिमान, आळस, असत्य, आनंद, ईश्वर, कर्म, क्रोध, कीर्ती यावर सुविचार सादर केलेले आहेत. आपल्या आयुष्यात या सर्व परिस्थितीचा आपल्याला सामना करावं लागत असतो, असे असून सुद्धा आपण प्रत्येक परिस्थिती कसा निर्णय घ्यावा. यासाठी हे सुविचार आपल्याला मदत करत असतात. युगानुयुगे चालत आलेल्या या जगात कीर्तिवंत व्यक्ती या सर्व परिस्थितीत जे निर्णय घेतात व आपल्याला सुद्धा योग्य मार्ग दर्शवितात यांनाच आपण सुविचार म्हणतो ज्याने आपण सर्व संकटात आपल्या मानसिक स्थितीचा तोल ढासळू न देता निर्णय घेऊ शकतो

अभिमानावर सुविचार | Motivational quotes in Marathi


पराक्रमाचा अभिमान असावा, पण उन्माद नसावा.

अहंकार हा तपः साधनेचा महान शत्रू आहे.

प्रार्थना हाच अहंकार नाशावर उपाय आहे.

अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.

अभिमानाने अलग रहाल, तर मराल.

अभिमान हे नरकाचे द्वार आहे.

अभिमान आठ प्रकारचा असतो – सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, शक्तीचा अभिमान, रूपाचा अभिमान, कुळाचा अभिमान, विद्वत्तेचा अभिमान आणि कर्तृत्त्वाचा अभिमान, परंतु मला अभिमान नाही. असे म्हणणे ह्याच्या सारखा भयंकर दुसरा अभिमान नाही.

तुमचा अहंकार दुसर्यांना कदाचित डंख करेल, परंतु तुमचे तर अधःपतनच करेल.

अहंकारी माणसाला दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही.👌

मोठ्या माणसाच्या अभिमानापेक्षा लहान माणसाची श्रद्धा पुष्कळ काम करू शकते.

अभिमानी साधूंपेक्षा पश्चाताप दग्ध होऊन परमेश्वराकडे क्षमायाचना करणारा पापी चांगला.

अहंभाव करील सम । तेणे पावसी वीश्राम रे । Suvichar in Marathi

वृक्ष फार लवती
लोंबती जलद घेऊनि नीरे
थोर गर्व न धरी विभवाचा
हा स्वभाव उपकार परांचा

जेव्हा अहंकार नष्ट होतो, तेव्हाच आत्मा जागृत होतो.

अहंकार माणसाला फुलवतो, परंतु त्याला कधीही आधार देत नाही.

मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत गर्व करू नये.

असत्य यावरील सुविचार | Life quotes in Marathi

असत्याची अनेक रूपे असतात, तर सत्याचे फक्त एक रूप असते.

सत्याच्या प्रतिष्ठेसाठी असत्याचा विध्वंस करावा लागतो.

असत्य अंध:कारातून मनुष्य अधोगतीकडे जातो. असत्याचा अंधःकारात सापडलेल्या व्यक्तीला सत्याचा प्रकाश दिसत नाही.

असत्य बोलणाऱ्याला कधी मित्र मिळत नाहीत, त्याला कधी पुण्य व यशही प्राप्त होत नाही.

असत्याचा विजय झाला, तरी तो क्षणभंगुर असतो.

Birthday Wishes in Marathi – Click here Suvichar in Marathi

एक असत्य लपवण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते आणि त्याच्यासाठी हजार प्रकारची चिंता करावी लागते. तेव्हा सत्य बोलण्याची सवय ठेवा म्हणजे कसली चिंताही करावी लागणार नाही व आपण काय बोलतो हे लक्षात ठेवावेही लागणार नाही.

हे असत्या, तू कितीही बलशाली बनलास तरी तू कधीही सत्य बनू शकणार नाही.👌

असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते. ते दुसऱ्याच्या आधाराशिवाय कधीच उभे राहू शकत नाही.

जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो इतर कशालाही घाबरत नाही.

लोक जसे सापाला घाबरतात, त्याचप्रमाणे ते खोटे बोलणाऱ्या माणसालाही घाबरतात. जगात सत्य हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सत्य हेच सर्व गोष्टींचे मूळ आहे.

खोटे बोलणारा मनुष्य “असत्य हे सत्य आहे” असे भासवत स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात करतो आणि शेवटी सत्यालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतो.

असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमेप्रमाणे असते. जखम भरून येते. परंतु, त्याची खून मात्र कायम राहते.

असत्य चिरडून टाकावे, धूर करून रोगजंतू मारतात तसे नष्ट करून टाकावे. नाहीतर ते सपाटून पसरू लागते.

आळस का नसावा याबद्दल सुविचार | Suvichar in Marathi

आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

अनेक दुःखसमुहाचे नाव “आलास” आहे.

अत्यंत आळशी असणाऱ्या लोकांमधून सैतान आपला शिष्य निवडत असतो.

आळस हा शरीराला व मनाला मिळालेला शाप आहे. तो दुराचाराचा जनक आहे व सैतानाचा आश्रयदाता आहे.

आळस म्हणजे मी एक प्रकारची आत्महत्या समजतो, कारण आळशी माणसांमधील माणूस मारून जातो, त्याच्यामध्ये जिवंत राहिलेली असते ती फक्त पशुत.

आळसाची गती मंद असते, त्यामुळे गरिबी लगेच त्याच्या गळ्यात पडते.

आळसाने खंगून जाण्यापेक्षा श्रम करीत झिजून जाणे अधिक चांगले.❤️

आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो. तत्परतेने उद्योग करण्यात प्रथम दुःख वाटले. तरी त्यापासून परिणामी सुख प्राप्त होते.

मुंगीपाशी जा. तिच्यापासून उद्योग शिका व शहाणे व्हा. Suvichar in Marathi

आळसावर मात करून, जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवितो तोच यशस्वी होतो.

काम करून मनुष्य कधी मरत नसतो तो आळशीपणाने मरत असतो.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की, तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

आळस म्हणजे प्रलोभनाचे मूळ आहे. रोगाला आमंत्रण आहे, वेळेची बरबादी आहे व बैचेनीची जणांनी आहे.

आनंद यावरील सुविचार | Life quotes in Marathi

खरा आनंद दुसर्यांना देण्यात असतो, घेन्यात किंवा मागण्यात नसतो.

तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्याला वाटाल, तेवढाच किंबहुना कास्ट आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.

आनंदाचा स्रोत तर तुमच्याजवळ आहे. परंतु तोच आनंद दुसऱ्याला देताना द्विगुणित होतो.

आपल्यासाठी आनंद प्राप्त करताना त्रास पडतो, परंतु तोच आनंद दुसऱ्याला देताना द्विगुणित होतो.

आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्य वर्धक साधने आहेत.

आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे. तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.

वसंत ऋतूप्रमाणे प्रसन्नता हो मनोद्यानातील सर्व कळ्यांना फुलवते.❤️

नोकरी विषयक माहितीसाठी – क्लिक करा Suvichar in Marathi

प्रसन्नता हे आत्म्याचे आरोग्य आहे व उदासीनता हे आत्म्याचे विष आहे.

प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे.

आनंद हे अमृत आहे. परंतु, हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंद रुपी अमृत प्राप्त होते.

प्रसन्नता हे ईश्वराने दिलेले औषध आहे.

आनंदी मनुष्य आत्म्याची शक्ती आहे.

प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.

कोणताही भर आनंदाने उचलला कि तो हलका होतो.

                                                       ईश्वर यांवरील सुविचार 

ज्याचे वर्णन करता येत नाही. परंतु, ज्याचे अस्तित्व आपणास पदोपदी जाणवते. पण ज्याविषयी आपणास काहीच माहित नाही, तोच परमेश्वर होय.

देव सज्जनांचा मित्र, शहाण्यांचा मार्गदर्शक, मूर्खांचा जुलूमशाहा आणि वाईटाचा शत्रू असतो.

ईश्वराची एखादी विशिष्ट बौद्धिक परिभाषा देता येत नाही. परंतु, आपल्या आत्म्याद्वारे त्याचे अस्तित्व जरूर अनुभवता येते.

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल, तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसणार कसा ?

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा आहे.

ईश्वर म्हणजे एक असे वर्तुळ आहे कि, ज्याचे केंद्र सर्वत्र आहे, परंतु ज्याचा परीघ कुठेच असत नाही.

नास्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे शून्य आहे व आस्तिक लोकांच्या मते ईश्वर म्हणजे पूर्णविराम आहे.

ईश्वर निराकार आहे. परंतु, तो भक्तांच्या आर्ट प्रार्थनेनुसार स्वतःच्या शक्तीने वेगवेगळी रूपे धारण करीत असतो.

ईश्वर एकच आहे. परंतु, ईश्वराचे भक्त त्याचे वेगवेगळे वर्णन करीत असतात.🙌

जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनांचा मोह सुटत नाही, तोपर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.

परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.

परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे, त्याच्या मानाने आपली श्रद्धाच अत्यंत अल्प असते.

सर्व व्याधींवरील एकमात्र महान औषध म्हणजे परमेश्वराचे स्मरण हेच होय. Suvichar in Marathi

                                                              कामांवरील सुविचार 

मोठमोठी कामे केवळ ताकदीने होत नाहीत तर ती शहंशाक्तूने होतात.

कोणतेही काम निष्ठा पूर्वक करा. कीर्ती तुमच्यामागे धावत येईल.

दुष्कृत्य झाकले जाईल असा पडदा बनवणारा विणकर आजपर्यंत जगात जन्माला आलेला नाही.

मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. माणसाच्या कार्यामुळे त्याच्या कर्तृत्वामुळे त्याचा गौरव वाढत असतो.

कर्माच्या स्वरूपाचा विचार केल्याने अंगी नम्रता येते, तर धर्माचा विचार केल्याने अंगी निर्भयता येते.

प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते असंभव वाटते.

अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक बरे.

कर्म म्हणजे कामधेनू आहे, ज्याला दोहन करता येते त्याला आनंदरूपी दूध प्राप्त होते.

कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.🙌

तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका.

ईश्वराच्या जवळ एक पाऊल सरकणे हेच एक शुभकार्य आहे.

सध्या तुझ्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखव, मग मोठे काम स्वतःहून तुझा मागोवा घेत येईल.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा, अंतरी धरीत बरे ।

                                                              क्रोध यावरील सुविचार 

क्रोध दुर्बलतेची निशाणी आहे.

सौंदर्य दृष्टी मौनाचे रूपांतर करते. दयादृष्टी विरोधाला अनुकूल करून घेते आणि क्रोधांधदृष्टी सौंदर्यास कुरूपता आणते.

क्रोधाच्या सिहासनावर बसताच, बुद्धी तेथून निघून जाते.

जेव्हा राग येतो, तेव्हा मनुष्याने प्रथम त्याच्या परिणामाचा विचार करावा.

जो क्रोधाग्नि तुम्ही तुमच्या शत्रूसाठी प्रज्वलित करता, तो क्रोधाग्नि त्याच्यापेक्षा तुम्हालाच जाळून भस्म करतो.

जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो, तेव्हा अभिमानी त्याच्यापुढे नतमस्तक होतो.

जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोखल्यामुळे त्वरित आवर घालतो. त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो.

क्रोध उत्पन्न करणाऱ्या कारणांपेक्षा त्याचा परिणाम अत्यंत दुःखमय असतो.

निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट आहे की, जी माणसाला पशु बनवते, विकृत करते.

क्रोध मूर्खतेतून सुरु होतो आणि पश्चातापात दग्ध होतो.

क्रोध म्हणजे क्षणिक वेडेपण आहे. त्याला कह्यात ठेवा. नाहीतर तो तुम्हाला ताब्यात घेईन.

क्रोधी बनून पापाचे भागीदार बनण्यापेक्षा, पापाविषयी राग येऊ द्या.

अतिक्रोध करू नये, जिवलगांस खेद नये ।
मनी वीट मानू नये, शिकवणेचा ।

क्रोध एक प्रकारचा झंझावात आहे. तो आला की, विवेकाला नष्ट करून टाकतो.

रागावलेला मनुष्य शांत झाला की, स्वतःवर पुन्हा संतापतो.

                                                     कीर्ती यावर सुविचार 

कीर्ती म्हणजे कधीही न शमणारी तृषा आहे.

कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे.

शत्रू कडून केली गेलेली प्रशंसा हीच सर्वोत्तम कीर्ती होय

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकरी आहे.

कीर्ती येते तेव्हा स्मृती अदृश्य होते.

कीर्ती मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात.

कीर्तीची नशा दारूच्या नशेपेक्षा भयंकर असते. एकवेळ दारू सोडणे सोपे आहे, परंतु कीर्तीचा हव्यास सोडणे अत्यंत कठीण आहे.

यशाचा – कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे.

RTE Admission Process 2024-25 – Click here Suvichar in Marathi

यश त्यागाने प्राप्त होते, दगाबाजीने नाही.

लाकूड जळते कारण त्यामध्ये जाळण्याजोग्या वस्तू असतात. तसेच मनुष्य सत्कीर्ती संपादितो कारण त्यासाठी आवश्यक गुण त्याच्यामध्ये असतात.

मरावे परी किर्तीरुपी उरावे.

स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार वर्तन केल्यास कीर्ती सहज प्राप्त होते.

कीर्ती नदीप्रमाणे उगम स्थानी अत्यंत रुंद असते, परंतु दूरवर गेल्यानंतर अतिविशाल होते.

उद्योग प्रियता, बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती व सद्भावना लाभते.

दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती आहे.

ज्याप्रमाणे खोल समुद्रात शिंपल्यामध्ये मोती तयार होत असतो, त्याप्रमाणे मृत्यूच्या शिंपल्यात गेल्यावर माणसाची कीर्ती वाढत राहते.

स्वतःच्या अंतरात्म्याच्या संकेतानुसार चालल्याने कीर्ती सहजतेने प्राप्त होते.