MARATHI UKHANE आपल्या मराठी संस्कृतीत कोणताही कार्यक्रम हा मराठी उखाणे याशिवाय अपूर्ण आहे. लग्न असो उखाणे हवे, हळद असो उखाणे हवे, सत्यनारायण पूजा असो उखाणे हवे, घरात कोणतीही पूजा असो उखाणे हवेच. अश्या प्रकारे कार्यक्रम कोणताही असो उखाणे याशिवाय मजा नाही. उखाणे ही पुरातन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. पुरातन काळात आपल्या नवरा व बायको यांच्याशी असलेले प्रेम हे, सर्वांसमोर बोलून न दाखवता ते उखाणे यातून दर्शवायचे, त्यात एक वेगळीच मजा होती, त्यासाठीच आपल्यासाठी लग्न, हळद, सत्यनारायण, पूजा अश्या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही उखाणे घेऊन आलो आहोत. नमस्कार 🙌 MARATHI UKHANE
MARATHI UKHANE
1) “एक होती चिऊ, आणि एक होता काऊ
_______ च नाव घेतो डोकं नका खाऊ”🙌
2) आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य तारांगणे
____ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे ❤️
3) आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा
____ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा 👌
4) प्रेम म्हणजे दोन जणांना जोडणारा पूल
____ च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल 👍
5) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
शोधून नाही सापडणार ____ सारखा हिरा😍
6) एका वर्षात महिने असतात बारा
____ मुळे वाढलाय आनंद सारा !❤️
MARATHI UKHANE FOR FEMALE
7) ती सोबत असली कि मूड होतो बरा
____ मुळे कळला जगण्याचा आनंद खरा👌
8) गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा
____ च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा 😘
9) लहान सहान गोष्टींनीही आधी व्हायचो त्रस्त
____ आल्यापासून आयुष्य खूपच मस्त 👌
10) माधुरीच्या अदा, कतरिनाचे रूप
____ ची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप 👍
11) ___ सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल 🙌
12) ___ च्या मैदानात खेळात होतो क्रिकेट
___ ला पाहून माझी पडली विकेट 🤣
MARATHI UKHANE FOR FEMALE
13) फुलांच्या तोरणात आंब्याचे पान
___ च्या रूपाने झालो मी बेभान 😍
14) तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी
बघताक्षणी प्रेमात पडलो ___ ची लाल ओढणी ❤️
15) ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल
___ च नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल😊
16) दवबिंदूंनी चमकतो फुलाचा रंग
सुखी आहे संसारात ___ च्या संग ❤️
17) हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू
मी आहे लंबू आणि ___ किती टिंगू 😍
18) झुळूझुळू पाण्यात हळू हळू चाले होडी
शोभून दिसते सर्वांमध्ये ___ आणि माझी जोडी 💕
19) मुद्दाम नाही करत नकळत हे घडत,
माझं मन रोज नव्याने ___ च्याच प्रेमात पडत😍
MARATHI UKHANE FOR FEMALE
20) डोळ्यावरची बट दिसते एकदम भारी
___ माझी झाल्यापासून जळतात बघा सारी 💕
21) सोन्याच्या कपावर चांदीची बशी
___ समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी 😍
22) एक, दोन, तीन, चार
___ वर आहे माझे प्रेम फार 💕
23) मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध
___ मुळे कळला मला, जीवनाचा आनंद 😘
24) प्रेमाच्या ओलाव्याने दुःख कोरडी झाली
___ माझ्या जीवनी चांदणे शिंपीत आली 👍
LIFE QUOTES IN MARATHI – Click here MARATHI UKHANE
25) पाहताक्षणी चढली प्रेमाची धुंदी
___ मुळे झाले, जीवन सुगंधी 👌
26) चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
___ च नाव घेतो पुढचं नाही पाठ 😂
27) गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप
___ वर माझे प्रेम आहे खूप खूप ❤️
28) कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव
___ च नाव घेतो बंद करा टिव टिव 😁
29) गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद
___ च्या नावातच सामावलाय माझा आनंद ❤️
30) चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती
___ च्या नुसत्या हसण्याने सारे श्रम माझे हरती 💕
31) गालावर खाली, डोळ्यात धुंदी ….
___ मुळे झाले जीवन सुगंधी 👌
MARATHI UKHANE FOR FEMALE
32) बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून व्हायचे आधी जागरण
आता मी खुश, पोटही खुश ___ निघाली सुगरण 🙌
33) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
___ चे नाव घेतो ऐका देऊन कान 🤣
34) डाळीत डाळ तुरीची डाळ
___ च्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ 😂
35) जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजूक फुले
___ ने दिली मला दोन गोड मुले 😘
36) हत्तीच्या अंबारीला मखमली झूल
___ माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल 🌹
37) जाई च्या वेणीला, चांदीची तार
___ माझी म्हणजे लाखात एक नार ❤️
38) भाजीत भाजी मेथीची
___ माझ्या प्रीतीची💕
MARATHI UKHANE FOR FEMALE
39) नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
___ चे रूप आहे खूप देखणे 💇♀️
40) चांदीच्या ताटावर सोन्याचे ठसे
___ ला पाहून, चंद्र सूर्यही आनंदाने हसे 😁
41) नंदन वनात आहेत अमृताचे कलश,
___ माझी आहे खूपच सालस 🙌
Birthday wishes in Marathi – Click here MARATHI UKHANE
42) कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड
___ जपतो मी जसा तळहाताचा फोड ❤️
43) चांदीच्या कढईत सोन्याचा झरा
___ चा स्वभाव मला खूपच प्यारा 💕
44) संध्याकाळच्या आकाशाचा पिवळा – केशरी रंग
___ माझी नेहमी, घर कामात असते दंग💇♀️
45) दोन शिंपल्याच्या कुशीत, वाढतो टपोरा मोती
___ ची व माझी अशीच राहो अखंड प्रीती 🙌
46) उंदीर राहतो ती जागा असते बीळ
घायाळ करतो ___च्या गालावरचा तीळ ❤️
47) ___ आणि माझं नात, आंबा कैरीची फोड
आंबट वाटलं आधी जरी पिकल्यावर मात्र गोड 😂
48) पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा
___ वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा 🌹
49) चंद्राला पाहून भरती येते सागराला
___ ची उत्तम साथ, मिळाली माझ्या जीवनाला 🌛
50) सनई आणि चौघडा, वाजतो सप्तसुरांत,
___ च नाव घेतो, ___ च्या घरात 🪕
51) मस्त लागते आंबट गोड संत्र्याची फोड,
माझ्या ___ च बोलणं मधापेक्षाही गोड 💕
52) खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,
___ माझी सगळ्यात देखणी💕
53) गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा
___ च नाव घ्यायला कधी पण सांगा 🙌
54) यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी,
___ ला घेऊन जातो तिच्या सासरी 🤣
55) मुंबई ते पुणे 3 तासांचे आहे अंतर
आधी खाऊन घेतो जरा नावच बघू नंतर😁
56) फुलात फूल जाईचे फूल
___ ने घातली मला भूल 👌
57) निर्मल मंदिर पवित्र मूर्ती
माझ प्रेम फक्त ___ वरती ❤️
58) गर गर गोल फिरतो भंवरा
___ च नाव घेतो मी तिचा नवरा🌹
59) चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
___ च नाव घेतो पुढच नाही पाठ.😂
60) माझ्या गुणी ___ ला पहा सगळयानी पारखून
जणू कोहिनूर हीरा आणले आम्ही पारखून 🌹
61) रूखमिनीने केला वर श्रीकृष्णालाच वारीन
___ च्या साथीने आदर्श संसार करीन ❤️
62) जशी आकाशात चंद्राची कोर
___ सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर 💕
63) कोरा कागद काळी शाई
___ ला देवळात जायची रोजच घाई 🤣
64) दारी होते पातेले त्यात होती पळी
___ आहे माझी खूपच भोळी 🙌
65) कापला टोमॅटो कापला कांदा
___ ल पाहून झालाय माझा वांदा 😁
66) प्रेमाच्या रानात नाचतो मोर
___ शी केले लग्न, नशीब माझ थोर 👌
67) सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य
___ आली जीवनात सुंदर झाले आयुष्य 😂
68) एक बाटली दोन ग्लास
___ आहे माझी फर्स्टक्लास 😘 MARATHI UKHANE
69) स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान
___ चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान ❤️
70) पिवळ सोन पांढरी शुभ्र चांदी,
___ ने काढली माझ्या नावाची मेहंदी 💕
71) मोठ्या समुद्रात छोटीशी जोडी
___ आणि माझी लाखात एक जोडी 🧑🤝🧑
72) अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना
___ चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना 💕
73) स्वराज्यासाठी सांडल होत मावळ्यांनी त्यांचे रक्त
___ चे नाव घेतो शिवरायांचा भक्त 🙌
74) निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती
माझ प्रेम फक्त ___ वरती 👌 MARATHI UKHANE
75) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
___ ची माझ्या हृदयात कोरली गेली फ्रेम 💕
76) सीतेसारखी चरित्र, लक्ष्मी सारख रूप
___ मला मिळाली आहे अनुरूप 😘
77) संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका
___ चे नाव घेतो सर्वजण एका. 💕
78) नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री
___ झाली आज माझी गृहमंत्री 🙌
नवरीसाठी उखाणे MARATHI UKHANE
79) संसार रूपी करंडा मनोरउपी झाकण
___ रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण 💕
80) अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस
___ रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस 😁
81) सायंकाळच्या वेळी दिव्य लावते नमस्कार करते देवाला
___ रावांचे नाव घेतांना आनंद होतो मनाला ❤️
82) गहू तांदळाने भरले सूप
___ रावांचा स्वभाव भारी आहे खूप 😂
83) रंग रंगांनी रंगले कृष्ण सावळा
___ रावांच नाव घेते आज आहे माझ्या लग्नाचा सोहळा 🌹 MARATHI UKHANE
84) हिरवीगार झाड, नदीच्या काठी
___ रावांच नाव घेते खास तुमच्यासाठी 👌
85) कपाळी लावली, टिकली चंद्रकोर
___ रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर 🙌
86) आकाशात उडतो पक्षांचा थवा
___ रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा 👌
87) लग्नानंतर बदलून चालत नाही नुसत नाव
बदलावा लागतो स्वभाव 🙌
88) ___ रावांच्या घरी मिळाला
माझ्या कला गुणांना वाव. 👌
89) पैठणीवर शोभते मोरांची जोडी,
___ रावांमुळे आली आयुष्याला गोडी ❤️
90) हळदी कुंकुसाठी, बेत केला श्रीखंड पुरणाचा
___ रावांचे नाव घेते, मान ठेवून सर्वांचा 👌
91)घातले मंगळसूत्र, लावले कुंकू
आणि नेसली मी साडी ❤️
92) लोक म्हणतात, शोभून दिसते
माझी नी ___ रावांची जोडी 👌
93) विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते
___ सर्वांना देवाकडे दीर्घायुष्य मागते. 😘
94) संसार रूपी वृक्षाला बांधून प्रेमाचा झूला
___ रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला 💕
95) फांदीवर गात होती पक्षांची जोडी
___ रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी 😘
96) सुहासिनीना शोभून दिसतो गळ्या मधाळ डोरल
___ रावांच नाव मी माझ्या हृदया मध्ये कोरल. ❤️
97) फुलांचा सुगंध पानसही लागे,
___ रावांसोबत जुळले जन्मो जन्मीचे धागे 🌹
98) विदयेची देवता आहेत, शिव पार्वतीचे पुत्र
___ रावांचे दीर्घायुष्यासाठी बांधते मी मंगळसूत्र ❤️
99) संसाराच्या सागरात उसळाव्यात प्रेमाच्या लाटा
___ रावांच्या सुख दु:खात अर्धा माझा वाटा 😘
100) मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळे मणी
___ राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी 💕
101) नवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद
___ रावांचे नाव घेताना होतो मला आनंद 😘 MARATHI UKHANE
102) दोन जिवांचे मिलन होऊन जुळल्या साताजन्माच्या गाठी
___ रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी 😂
103) वडीलधाऱ्या व्यक्तींशी मी नेहमी प्रेमाने वागते,
___ रावांच्या प्रगतीसाठी त्यांना दीर्घायुष्य मागते ❤️
104) हिरवे हिरवे पान लाल लाल फूल
___ रावांच्या रुपाची मला भूल 😂 MARATHI UKHANE